मुंबई :
मालाड-मालवणीमधील मरीना एन्क्लेव्हच्या मागील बाजूस, पाठारेवाडी स्मशानभूमी परिसरात महसूल, पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहिमेद्वारे अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. सर्व्हे क्र. २१५, नवीन भूखंड क्र. ७४६ या शासकीय जमिनीवरील एकूण १७ अनधिकृत गोदामे हटवून २३,९३४ चौरस मीटर जमीन अतिक्रमणमुक्त केली.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि पश्चिम उपनगर अपर जिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, प्रभारी उपजिल्हाधिकारी विनायक पाडवी, तहसीलदार इरेश चप्पलवार, पी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी, सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी सहभाग घेतला.
शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांवर यापुढेही कारवाईअधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही कारवाई पार पाडण्यात आली. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून, कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण सहन केले जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Web Summary : Authorities demolished 17 illegal warehouses in Malad's Malvani area, reclaiming 23,934 square meters of government land. The action, led by key officials, signals a continued crackdown on encroachments on government properties. No encroachment will be tolerated, says administration.
Web Summary : मलाड के मालवणी इलाके में अधिकारियों ने 17 अवैध गोदामों को ध्वस्त कर दिया, जिससे 23,934 वर्ग मीटर सरकारी भूमि वापस मिल गई। प्रमुख अधिकारियों के नेतृत्व में यह कार्रवाई सरकारी संपत्तियों पर अतिक्रमण के खिलाफ निरंतर कार्रवाई का संकेत है। प्रशासन का कहना है कि कोई अतिक्रमण बर्दाश्त नहीं किया जाएगा।