Join us  

जादा दर आकारल्यास कारवाई; मुंबई पालिकेकडून खासगी रुग्णालयांसाठी कोविड लसींचे दर निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 9:34 PM

Coronavirus Vaccine : सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण. पालिकेकडून खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप, लसींचे दर निश्चित.

ठळक मुद्देसध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण.पालिकेकडून खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप, लसींचे दर निश्चित.

मुंबई - कोविड प्रतिबंधक ल खासगी रुग्णालयांमध्ये वेगवेगळे दर आकारण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांची होणारी लूट रोखण्यासाठी केंद्र सरकारने कोविड लसींचे कमाल दर निश्चित केले आहेत. मात्र यापेक्षा जास्त दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णांना या बाबत तक्रार करण्यासाठी महापालिकेने विशेष ईमेल आयडी जाहीर केला आहे.मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३९ लाख नागरिकांनी लस घेतली आहे. यासाठी शासकीय व पालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लस देण्यात येत आहे. लस मिळवण्यासाठी नाागरिक दामदुप्पट पैसेही मोजण्यास तयार होतात. परंतु, अवाजवी शुल्क आकारल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराा पालिका प्रशासनाने दिला आहे. दरम्यान नागरिकांना complaint.epimumbai@gmail.com या ईमेल आयडीवर आपली तक्रार नोंदवता येणार आहे.

असे आहेत दर...कोविशिल्डः ६००+३०+१५०= ७८० रूपये कोवॅक्सिनः १२००+६०+१५०=१,४१० रूपये स्पुतनिक-व्हीः ९४८+४७+१५०=१,१४५ रुपये

कोण करू शकतो तक्रार...नागरिक, गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकारी, औद्योगिक संस्था प्रमुख यांनी खासगी रुग्णालयाने आकारलेले लसीचे दर अवाजवी आढळल्यास तक्रार करू शकतात. 

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्रमुंबई महानगरपालिका