पाच बड्या आॅइल माफियांवर कारवाई
By Admin | Updated: July 14, 2015 03:03 IST2015-07-14T03:03:45+5:302015-07-14T03:03:45+5:30
चोरी केलेल्या आॅइलची विक्री करणाऱ्या पाच आॅइल माफियांना मोटार वाहनचोरी विरोधी पथकाने शनिवारी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून टेम्पोसह १,९८० लिटर

पाच बड्या आॅइल माफियांवर कारवाई
मुंबई : चोरी केलेल्या आॅइलची विक्री करणाऱ्या पाच आॅइल माफियांना मोटार वाहनचोरी विरोधी पथकाने शनिवारी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून टेम्पोसह १,९८० लिटर लुब्रिकंट आॅइल जप्त करण्यात आले.
अहमद मोहम्मद इस्लाम अन्सारी, जावेद अहमद मोहम्मद इस्लाम अन्सारी, विजय कुमार सुब्रमण्यम हरिजन, ब्रिजेशकुमार श्रीसहदेव कुमार सरोज आणि मोहम्मद सईद इस्त्राईल अशी या आरोपींची नावे आहेत. शिवडी परिसरात चोरी केलेल्या आॅइलची अवैद्यरीत्या विक्री सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मोटार वाहनचोरी विरोधी पथकाला मिळाली होती.
शनिवारी हा साठा घेऊन ही टोळी शिवडी परिसरातील क्विक स्ट्रीट परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार या परिसरात सापळा रचून पाच जणांना अटक करण्यात आली. यात आणखी तिघांचा सहभाग उघड झाला असून, त्यांचा शोध सुरू आहे. अटक आरोपींकडून ४ लाख किमतीच्या टेम्पोसह १,९८० लिटर लुब्रिकंट आॅइल जप्त करण्यात आले आहे. यात एकूण साडेपाच लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)