कर्जत नगरपरिषदेची बांधकामावर कारवाई
By Admin | Updated: December 19, 2014 00:06 IST2014-12-19T00:06:09+5:302014-12-19T00:06:09+5:30
शहर झपाट्याने वाढत असल्याने कर्जत नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्र मण होत आहे.

कर्जत नगरपरिषदेची बांधकामावर कारवाई
कर्जत : शहर झपाट्याने वाढत असल्याने कर्जत नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्र मण होत आहे. याबाबत कर्जत नगरपरिषदेने आता अशा कामावर कारवाई सुरु केली आहे. दहिवलीमधील एका इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर नगरपरिषदेने कारवाई करु न ते काम काही प्रमाणात तोडले आहे.
शहरातील अनेक इमारतींवर अनधिकृत बांधकामे झाली आहेत, अशी चर्चा आहे, बघू या अशा कामांवर नगरपरिषद प्रशासन काही कारवाई करते का? याबाबत नगरपरिषद कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार नगरपरिषद हद्दीतील मौजे दहिवली तर्फे नीड येथील कर्जत लॅन्ड डेव्हलपर्सचे भागीदार प्रशांत चोक्सी यांनी या जागेवर तीन मजली इमारत बांधण्याची परवानगी नगरपरिषद कार्यालयाकडे मागितली होती, मात्र प्रत्यक्षात त्यांनी या ठिकाणी पाच मजली इमारत बांधकाम सुरु केले. म्हणजे परवानगीपेक्षा दोन मजल्याचे वाढीव बांधकाम केले होते.
याबाबत नागरिकांची तक्रार होती, त्यानुसार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य अभियंता नीलेश चौडिये, नीलेश डोळस, विलास गायकवाड व अनधिकृत बांधकाम तोडणारे पथक सदर इमारतीवर गेले व इमारतीवरील अनधिकृत बांधकामाचा काही भाग तोडला आहे. परवानगीपेक्षा वाढीव बांधलेले दोन मजले तोडण्याचे आदेश नगरपरिषदेने इमारतीच्या मालकांना दिले आहेत अशी माहिती मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांनी दिली. या इमारतीवरील वाढीव अनधिकृत बांधलेले मजले तुटणार की वाचणार? तसेच शहरातील अनेक इमारतीवर अशीच अनधिकृत बांधकामे झाली आहेत, अनेक इमारतीच्या खाली बांधकामाच्या वेळी पार्किंग जागा सोडली होती.