अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध कारवाई

By Admin | Updated: March 26, 2015 01:28 IST2015-03-26T01:28:51+5:302015-03-26T01:28:51+5:30

राज्यातील अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र परावैद्यक परिषद विधेयक २०११ मध्ये योग्य दुरुस्ती करून हे विधेयक पुन्हा मांडण्यात येईल

Action against unauthorized pathology lab | अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध कारवाई

अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध कारवाई

मुंबई : राज्यातील अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र परावैद्यक परिषद विधेयक २०११ मध्ये योग्य दुरुस्ती करून हे विधेयक पुन्हा मांडण्यात येईल आणि नवीन कायदा केला जाईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिले.
‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे मुंबईतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचा पर्दाफाश केला होता. राज्यामध्ये सध्या ३ ते ५ हजार अनधिकृत लॅब असून, त्यातील ६० ते ७० टक्के लॅबरॉटरीज शहरी भागात असून, त्यामधून प्रतिदिन हजारो रुग्णांच्या चाचण्या करण्यात येत असून या चाचण्या अनधिकृत लॅबरॉटरीजमध्ये केल्या जात असल्याची लक्षवेधी सूचना विजय वड्डेटीवार, प्रा. वीरेंद्र जगताप आदी सदस्यांनी विधानसभेत मांडली होती. या सुधारणांचा विचार करून हे विधेयक दुरुस्तीसह पुन्हा पाठविण्यास राज्य सरकारची तयारी आहे. त्यामुळे सदर विधेयक मागे घेऊन ते दुरुस्तीसह पुन्हा मांडण्यात येईल. यासाठी आवश्यक विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागविण्यात येईल. तसेच १० वी आणि १२वीच्या शिक्षणाच्या आधारे बोगस पॅथॉलॉजी लॅब सुरू करणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाईल. (विशेष प्रतिनिधी)

च्अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब विरुद्ध कारवाई करण्यासाठी सध्या कायद्याचा आधार नाही. यासाठीच महाराष्ट्र परावैद्यक परिषदचे विधेयक २०११ मध्ये मांडण्यात आले होते.
च्विधिमंडळाने हे विधेयक संमत करून राज्यपालांनी सहीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविले. परंतु केंद्र सरकारने यामध्ये काही सुधारणा सुचविल्या आहेत.

Web Title: Action against unauthorized pathology lab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.