मुंबई : मुंबईत सध्या कबुतरखान्यावरील कारवाईने वातावरण तापले असून, प्रत्येक ठिकाणी याबद्दल मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. एकीकडे श्वसन विकाराने माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. जोपर्यंत आपल्या जवळच्या लोकांना असा काही आजार होणार नाही, तोपर्यंत कबुतरांमुळे होणाऱ्या या आजारांकडे कोणी लक्ष देणार नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त करून काही संघटनांसह अनेक मुंबईकर कबुतरखान्यावर होत असलेल्या कारवाईला पाठबळ देत आहेत, तर दुसरीकडे जैन समाजातून या कारवाईविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
अन्यथा १० ऑगस्टपासून जैन मुनींसह उपोषणकबुतरखान्यावरील कारवाई ही विकासकाच्या दबावाखाली राज्य सरकार करत असल्याची टीका जैन समाजाकडून करून रोष व्यक्त केला जात आहे. पालिकेने दादर कबुतरखाना बंद करण्यापूर्वी कोणतेही नियोजन न करता, पर्यायी व्यवस्था न करता कारवाई केल्याची टीका जैन नागरिक करत आहेत. बंदिस्त केलेला कबुतरखाना उघडा करून कारवाई न थांबवल्यास येत्या १० ऑगस्टपासून जैन मुनींसह शेकडो कार्यकर्ते उपोषणाला बसण्याचा निर्णय जैन समाजाने घेतल्याची माहिती माजी नगरसेवक पूरण दोषी यांनी दिली.
‘आरोग्यासाठी कबुतरखाने बंद करण्याची कारवाई योग्य’मुंबईत आधीच पाणी तुंबणे, वाहतूककोंडी, कचऱ्यासारख्या खूप समस्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला महत्त्व देऊन विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी सार्वजनिक ठिकाणावरील कबुतरखाने बंद करण्याची कारवाई योग्य असल्याचे चकाचक दादर संघटनेचे चेतन कांबळे यांनी म्हटले आहे. ज्यांना कबुतरांना दाणे टाकायचे आहेत, त्यांनी खासगी जागांमध्ये व्यवस्था करून जबाबदारी घ्यावी, असेही नमूद केले आहे.