डेब्रिजच्या १० गाड्यांवर कारवाई
By Admin | Updated: August 15, 2014 01:53 IST2014-08-15T01:53:40+5:302014-08-15T01:53:40+5:30
औद्योगिक वसाहतीमध्ये अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्यां विरोधात मनपाने कडक कारवाई सुरू केली आहे.

डेब्रिजच्या १० गाड्यांवर कारवाई
नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमध्ये अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्यां ंविरोधात मनपाने कडक कारवाई सुरू केली आहे. आज एकाच वेळी १० डंपर ताब्यात घेतले आहेत. मुंबई व ठाणेमधून डेब्रिज माफिया मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये डेब्रिज टाकत आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये मोकळ्या जागांवर भरणी केली जात आहे. आज भरारी पथकाने दहा डंपर ताब्यात घेतले आहेत. सर्व डंपर ताब्यात घेवून कोपरखैरणेमधील क्षेपणभूमीवर ठेवण्यात आले आहेत. या सर्वांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख अजीज शेख यांनी दिली. (प्रतिनिधी)