नागपाडा हत्या प्रकरणी आरोपीच्या वडिलांनाही अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 02:44 IST2018-05-16T02:44:36+5:302018-05-16T02:44:36+5:30

नागपाडा येथील मोहम्मद रशीद सईद अन्सारी (३०) या तरुणाच्या हत्येप्रकरणी फाझील कयुम करीम अन्सारी (३५) याला अटक करण्यात आली आहे.

The accused's father was also arrested in the Nagpada murder case | नागपाडा हत्या प्रकरणी आरोपीच्या वडिलांनाही अटक

नागपाडा हत्या प्रकरणी आरोपीच्या वडिलांनाही अटक

मुंबई : नागपाडा येथील मोहम्मद रशीद सईद अन्सारी (३०) या तरुणाच्या हत्येप्रकरणी फाझील कयुम करीम अन्सारी (३५) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर फाझीलच्या वडिलांनी अन्सारी कुटुंबीयांना धमकाविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी फाझीलच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
मदनपुरा येथील लोहाटी चाळ परिसरात रात्री उशिरा मोहम्मद रशीद सईद अन्सारी (३०) हे मित्र मोहम्मद रिजवान कुरेशी (३०) सोबत गप्पा मारत होते. त्याच दरम्यान रागाने पाहिले म्हणून फाझीलने अन्सारीची हत्या केली. या गुन्ह्यात फाझीलला अटक केली. मात्र, फाझीलच्या अटकेनंतर त्याचे वडील कयुमने अन्सारीच्या भावाला धमकाविण्याचा प्रयत्न केला. आणखी काही जणांना जीवे मारणार असल्याचे सांगितले.

Web Title: The accused's father was also arrested in the Nagpada murder case