मुलांवर अत्याचार करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:08 IST2017-08-05T03:08:04+5:302017-08-05T03:08:08+5:30

दोन अल्पवयीन मुलांवर कांदिवली येथे करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी पोलिसांनी सलीम शेख (३३), या विकृताला अटक केली आहे.

 Accused of torturing children | मुलांवर अत्याचार करणारा अटकेत

मुलांवर अत्याचार करणारा अटकेत

मुंबई : दोन अल्पवयीन मुलांवर कांदिवली येथे करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी पोलिसांनी सलीम शेख (३३), या विकृताला अटक केली आहे.
येथील परिसरात नऊ आणि दहा वर्षांच्या मुलांवर त्याने लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी जून महिन्यात कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी कांदिवली पोलिसांसह क्राइम ब्रांचचे कक्ष-११ देखील समांतर तपास करत होते. दरम्यान, कक्ष-११चे पोलीस निरीक्षक रावराणे, पोलीस नाईक देसाई आणि पोलीस कॉन्स्टेबल दहिफळे यांना शेख हा तेलंगणामध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ११चे प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली रावराणे यांचे पथक तेलंगणात दाखल झाले. त्यांनी शेखला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबूल केला आहे.

Web Title:  Accused of torturing children