खून करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: May 17, 2015 23:39 IST2015-05-17T23:39:22+5:302015-05-17T23:39:22+5:30
व्यवसाय करण्याकरिता दिलेले दीड लाख रुपये परत देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या मित्राचा खून करून उत्तरप्रदेशमध्ये पळून गेलेल्या आरोपीला

खून करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
बोईसर : व्यवसाय करण्याकरिता दिलेले दीड लाख रुपये परत देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या मित्राचा खून करून उत्तरप्रदेशमध्ये पळून गेलेल्या आरोपीला तारापूर पोलिसांनी अटक केली. मात्र यातील अन्य दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले.
मुळचा बिहार व सध्या शुक्ला कंपाऊड बोईसरमध्ये राहणारा विनोद चौधरी (२६) याने तडीयाले वाणगाव येथे मॅकेनिकचे काम करणारा विनोद चव्हाण याला दीड लाख रुपये उधार दिले होते. ते परत देण्यासाठी अनेकवेळा तगादा लावल्यानंतर अखेर २ मे २०१५ रोजी विनोद चौधरी याला ‘तुला पैशाची मदत करतो, असे आमिष दाखवून चित्रालयजवळ बोलवले. त्यानंतर मोटर सायकल घेऊन रमेश चव्हान, सोहीन रामगौतम याच्यासह विनोद चौधरीला घेऊन गेले आणि परनाली-वाणगाव रस्त्यावरील खतवालीपाडा येथे त्याचा खून केला.माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी घटनेचा तपास सुरु केला. यात विनोद चव्हाण आपल्या दोन्ही साथीदारांसह पळून आजमगढ येथे पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पथक तयार करून तिथून त्याला अटक केली.