मॉडेलकडे खंडणी मागणारा अटकेत

By Admin | Updated: December 28, 2015 03:49 IST2015-12-28T03:49:31+5:302015-12-28T03:49:31+5:30

टीव्ही सिरियलमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीचे फेसबुक, जीमेल, इन्स्टाग्राम आणि आयक्लाऊड खाते हॅक करुन १६ वर्षाच्या युवकाने खंडणीसाठी धमकाविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

The accused is facing a ransom demand for the model | मॉडेलकडे खंडणी मागणारा अटकेत

मॉडेलकडे खंडणी मागणारा अटकेत

मुंबई : टीव्ही सिरियलमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीचे फेसबुक, जीमेल, इन्स्टाग्राम आणि आयक्लाऊड खाते हॅक करुन १६ वर्षाच्या युवकाने खंडणीसाठी धमकाविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बांगुरनगर पोलिसांनी रविवारी त्याला दहिसर परिसरातून अटक केली. खासगी फोटो प्रदर्शित करण्याची भीती दाखवून ५ लाखांची मागणी केली होती.
हा युवक मूळचा उत्तरप्रदेशमधील असून सहा महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. नालासोपारा येथे भाड्याची खोली घेऊन तो राहत होता. आरोपीने मालाडमध्ये राहत असलेल्या एका मॉडेलला फिशिंग मेल पाठवून त्याआधारे तिचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड मिळवला. तिचे फेसबुक, जीमेल, इन्स्टाग्राम आणि आयक्लाऊड खाते हॅक करुन खासगी फोटो डाऊनलोड करुन घेतले. अभिनेत्रीच्या मोबाईल नंबरवरील व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटवर हे फोटो पाठविण्यास सुरुवात केली. हे सर्व फोटो हवे असतील तर ५ लाख रुपये देण्याची मागणी केली. अभिनेत्रीने पैसे देण्यास नकार देताच आरोपी तरुणाने हे सर्व फोटो सोशल मिडीया आणि प्रसिद्धी माध्यमांवर टाकून तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली होती. (प्रतिनिधी)

Web Title: The accused is facing a ransom demand for the model