न्यायालयातून आरोपी पसार
By Admin | Updated: September 23, 2015 00:51 IST2015-09-23T00:51:20+5:302015-09-23T00:51:20+5:30
न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनाविल्यानंतर जामीन अर्जाच्या मागणीसाठी बाहेर पडलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्याची घटना मंगळवारी

न्यायालयातून आरोपी पसार
मुंबई : न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनाविल्यानंतर जामीन अर्जाच्या मागणीसाठी बाहेर पडलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्याची घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. तौफिक अहमद झैदी (३०) असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवंडी बैंगनवाडी येथे राहत असलेल्या झैदीला ४ एप्रिल २०१५ रोजी पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. झैदीला मंगळवारी दुपारच्या सुमारास सत्र न्यायालयात आणण्यात आले. न्यायाधीशाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र त्यानंतर झैदीने जामीन अर्जाची मागणी केली. त्यासाठी बाहेर येताच त्याने पळ काढला
तब्बल तीन तासाच्या शोध मोहिमेनंतर आरोपी पसार झाल्याची खात्री पोलिसांना होताच याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. (प्रतिनिधी)