हुंड्याचा गुन्हा दाखल आलेल्या आरोपीची आत्महत्या
By Admin | Updated: February 8, 2017 14:27 IST2017-02-08T14:27:50+5:302017-02-08T14:27:50+5:30
हुंड्यासाठी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीने आत्महत्या केल्याची घटना पनवेल तालुक्यातील वडघर गावात घडली

हुंड्याचा गुन्हा दाखल आलेल्या आरोपीची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
पनवेल, दि. ८ - हुंड्यासाठी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीने आत्महत्या केल्याची घटना पनवेल तालुक्यातील वडघर गावात घडली. सचिन चैत्रे असे त्याचे नाव असून गेल्या महिन्यात २६ तारखेला पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी सचिनवर हुंडाबळीच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्यांनतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर सचिन ला अटक करण्यात आली होती. मात्र अटक केल्यांनतर सचिनची तब्येत अचानक खालावल्याने त्याला दवाखान्यात दाखल केले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.