अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 05:29 IST2018-09-12T05:29:43+5:302018-09-12T05:29:46+5:30

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या धावत्या लोकलच्या महिला बोगीत तरुणीसोबत अश्लील चाळे करणा-या आरोपीला घटनेनंतर अवघ्या चार दिवसांत अटक करण्यात आली.

The accused arrested for pornography were arrested | अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला अटक

अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला अटक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या धावत्या लोकलच्या महिला बोगीत तरुणीसोबत अश्लील चाळे करणा-या आरोपीला घटनेनंतर अवघ्या चार दिवसांत अटक करण्यात आली. इम्रान असे या आरोपीचे नाव असून त्याला फोर्ट परिसरातून ताब्यात घेतले.
सदर घटनेतील पीडित तरुणी तक्रार दाखल करण्यासाठी आलेली नाही. तथापि या प्रकारच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथकांची नियुक्ती केली होती. आरोपीच्या व्हिडीओतील छायाचित्रानुसार शोध सुरू करण्यात आला. अखेर मंगळवारी त्याला अटक करण्यात सीएसएमटी रेल्वे पोलिसांना यश आले.
शनिवार, ७ सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर महिला डब्यातील मुलगी खूपच घाबरल्याने रडत होती. यामुळे तक्रार न करताच ती निघून गेल्याचे त्याच लोकलमधील महिला डब्याच्या बाजूच्या डब्यातून प्रवास करणा-या जितेश या तरुणाने सांगितले. या घटनेची तक्रार जितेशने रेल्वे पोलीस ठाण्यात केली. घटनेबाबत जितेश रेल्वे पोलिसांच्या संपर्कात होता. या पाठपुराव्याला यश आले. रेल्वे पोलिसांचे सहकार्य लाभल्याने आरोपीला अटक झाल्याने भविष्यात अशा घटनांना आळा बसेल, असा विश्वास जितेशने व्यक्त केला. आरोपीला न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: The accused arrested for pornography were arrested