उपप्राचार्याला ५० हजाराची लाच स्वीकारताना अटक
By Admin | Updated: March 15, 2015 00:19 IST2015-03-15T00:19:18+5:302015-03-15T00:19:18+5:30
पदावरील नियूक्ती देण्याकरीता ढमाल यांनी तब्बल ११ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

उपप्राचार्याला ५० हजाराची लाच स्वीकारताना अटक
अलिबाग : सहाय्यक शिक्षक पदावर नियुक्ती देण्याकरीता ११ लाख २० हजार रुपयांची मागणी करून पहिल्या हप्त्यांत १ लाख २० रुपये घेवून, पुढी हप्त्याची ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना, माणगाव येथील अशोकदादा साबळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य तानाजी ज्योतीराम ढमाल यास शुक्रवारी सापळा रचून रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक सुनील कलगुटकर यांच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
सातारा जिल्ह्यातील फलटन येथील रहिवासी असणारे ढमाल हे या कनिष्ठ महाविद्यालयात उपप्राचार्य पदावर कार्यरत आहेत. याच कनिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक शिक्षक या पदाकरीता एका उमेदवारीची निवड करण्यात आली होती. त्याला या पदावरील नियूक्ती देण्याकरीता ढमाल यांनी तब्बल ११ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी १ लाख २० हजार रुपये
त्या उमदवाराने पहिल्या टप्प्यात उपप्राचार्य ढमाल यांना दिले, मात्र त्यांनी संपूर्ण लाचेच्या रकमेचीच मागणी केली.
अखेर त्या उमेदवाराने रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या येथील कार्यालयात गुरुवारी तक्रार केली. त्यावरून महाविद्यालयातच सापळा लावला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ढमाल यास अटक केली. दरम्यान उपप्राचार्य ढमाल यांची घरझडती व अन्य तपास सध्या सुरु असून, माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला आहे.
च्अलिबाग : एका प्रकरणात गुन्हा दाखल करू नये म्हणून ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तळा पोलीस ठाण्यातील हवालदार महेश रामचंद्र गायकवाड यास गुरुवारी शहरातील एका हॉटेल समोर सापळा रचून पकडण्यात आले. शुक्रवारी त्यास माणगांव न्यायालयासमोर हजर केले असता १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली
च्तळा तालुक्यात राहणाऱ्या एका व्यक्तीविरोधात प्रलंबित अर्जावरून गुन्हा दाखल करू नये यासाठी तळा पोलीस ठाण्याचे हवालदार महेश रामचंद्र गायकवाड यांनी ५० हजाराची मागणी केली होती. तक्रारदाराने १५ हजार देऊन सामोपचारने तोडगाही काढला होता. तरीही पुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदार गायकवाड यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती रक्कम ३० हजार ठरली. ती स्वीकारताना रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गायकवाडला अटक केली.