वृद्धांना लुटणारा आरोपी अटकेत

By Admin | Updated: June 28, 2017 03:38 IST2017-06-28T03:38:15+5:302017-06-28T03:38:15+5:30

बँकेमधून बाहेर पडणाऱ्या वृद्ध इसमांना पैसे मोजून देण्याच्या बहाणा करत लुटणाऱ्या एका आरोपीला गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे.

The accused arrested | वृद्धांना लुटणारा आरोपी अटकेत

वृद्धांना लुटणारा आरोपी अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बँकेमधून बाहेर पडणाऱ्या वृद्ध इसमांना पैसे मोजून देण्याच्या बहाणा करत लुटणाऱ्या एका आरोपीला गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे. अमजद इराणी (४०) असे या आरोपीचे नाव असून तो सराईत चोरटा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारे वृद्ध इसमांना लुटण्याच्या घटना वाढत असल्याने गोवंडी पोलिसांनी बँकांबाहेर गस्त
वाढवली होती.
त्यानुसार गोवंडी येथील एका स्टेट बँकेबाहेर हा इसम संशयास्पद फिरत असताना पोलिसांना दिसला. त्यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याजवळ पोलिसांना घरफोडीचे सामान आढळून आले आहे.
तसेच त्याने बँकेतून बाहेर पडणाऱ्या वृद्ध इसमांना पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने लुटल्याची कबुलीदेखील दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत या आरोपीला अटक केली आहे.

Web Title: The accused arrested