मेट्रो विनयभंग प्रकरणातील आरोपी गजाआड

By Admin | Updated: September 1, 2014 22:45 IST2014-09-01T22:45:16+5:302014-09-01T22:45:16+5:30

मेट्रो विनयभंग प्रकरणातील आरोपी गजाआड

The accused accused in the Metro molestation case | मेट्रो विनयभंग प्रकरणातील आरोपी गजाआड

मेट्रो विनयभंग प्रकरणातील आरोपी गजाआड

ट्रो विनयभंग प्रकरणातील आरोपी गजाआड
घाटकोपर : महिनाभरानंतर मेट्रोमध्ये २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग करणार्‍या आरोपीला अटक करण्यात घाटकोपर पोलिसांना यश आले आहे. सय्यद रिझवान लतीफ शाह (२४) असे आरोपीचे नाव असून, तो चिरागनगर येथे राहणारा आहे.
शाह हा चिरागनगर येथून मित्रांसोबत टिंगलटवाळी करीत जात असताना गस्तीवर असलेल्या दोन पोलीस हवालदारांची नजर त्याच्यावर पडली. मेट्रोत तरुणीच्या विनयभंगातील फरार आरोपीसारखा तो दिसत असल्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या अधिक तपासात त्याने गुन्‘ाची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली. शाहला विनयभंग आणि अश्लील, अपशब्द वापरल्याप्रकरणी अटक करण्यात आली. कोठडीत रवानगी झालेल्या शाहला १० हजारांच्या जामिनावर सोडण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी शाह आपल्या मित्रांसोबत मालाड येथील नातेवाइकांना भेटण्यासाठी जात असताना त्याने हा प्रकार केला असल्याचे घाटकोपर पोलिसांनी सागितले.
तक्रारदार तरुणी मुलुंडमध्ये राहण्यास असून, अंधेरी येथे कामाला आहे. ४ तारखेला तिने नेहमीप्रमाणे घाटकोपर येथून अंधेरीसाठी मेट्रो पकडली होती. त्याचदरम्यान तिच्यासमोर बसलेल्या शाहने अश्लील हावभाव करीत तिच्या शरीराकडे तो एकसारखे पाहात होता. त्यानंतर तिने अंधेरीला उतरून डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी ५ ऑगस्ट रोजी घाटकोपर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित तरुणीने मोबाइलमध्ये घेतलेल्या शाहच्या फोटोवरून त्याचा तपास सुरू होता. अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला. (प्रतिनिधी)

Web Title: The accused accused in the Metro molestation case