हल्ल्याप्रकरणी आरोपी अटकेत
By Admin | Updated: December 20, 2014 01:22 IST2014-12-20T01:22:24+5:302014-12-20T01:22:24+5:30
पूर्ववैमनस्यातून भांडुपमधील एका बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये देववत मिश्रा या इसमावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी विकी सिंग (२६) याच्या भांडुप पोलिसांनी २४ तासांच्या आत मुसक्या आवळल्या आहेत.

हल्ल्याप्रकरणी आरोपी अटकेत
मुंबई : पूर्ववैमनस्यातून भांडुपमधील एका बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये देववत मिश्रा या इसमावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी विकी सिंग (२६) याच्या भांडुप पोलिसांनी २४ तासांच्या आत मुसक्या आवळल्या आहेत.
मुळात भांडुप हनुमान नगर येथून सिंगला अटक केली. त्याच्याकडील गावठी कट्टाही पोलिसांनी हस्तगत केला आहे. हत्येच्या गुन्ह्यात बाहेर आलेला आरोपी विकी सिंग पूर्वी साथीदार संजय सिंग याच्यासोबत काम करत होता. मात्र काही कारणास्तव दोघांमध्ये खटके उडाले. आणि दोघेही एकमेकांंचे कट्टर विरोधक झाले होते.(प्रतिनिधी)