फरार आरोपी तब्बल चार वर्षानंतर गळाला
By Admin | Updated: August 28, 2014 20:55 IST2014-08-28T20:55:31+5:302014-08-28T20:55:31+5:30
हॅलोसाठी....

फरार आरोपी तब्बल चार वर्षानंतर गळाला
ह लोसाठी....फरार आरोपी तब्बल चार वर्षानंतर गळालामुंबई: बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला तब्बल चार वर्षांनंतर गुन्हेगारी गुप्तवार्ता विभाग पथकाने बुधवारी अटक केली. ममरुद्दीन शेख असे या आरोपीचे नाव असून तो झारखंडचा राहणारा आहे.चार वर्षांपूर्वी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांची तस्करी वाढली होती. यासाठी मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाने एक पथक स्थापन करुन या आरोपीचा शोध सुरु केला होता. दरम्यान, झारखंड येथून बनावट नोटा घेऊन त्यांची मुंबईत विक्री करणार्या दोन आरोपीबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार ३१ एप्रिल २००९ ला पोलिसांनी शिवडीतील गोकूळ बार परिसरात सापळा रचून ममरुद्दीनसह त्याचा साथीदार अल्लाउद्दीन शेख या दोघांना अटक केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून ८० हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. या आरोपींना लवकरच शिक्षा मिळावी, यासाठी त्यांचा खटला जलदगती न्यायालयात दाखल केला. त्यानुसार न्यायालयाने दोघांनाही पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. मात्र, आरोपींनी उच्च न्यायालयात अपिल दाखल केला. उच्च न्यायलयाकडूून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, दोघेही आरोपी जामिनावर असताना पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट जारी केले. पोलिसांनी या आरोपींना शोधण्यासाठी अनेक ठिकाणी छापे मारले. तसेच त्यांच्या मूळ गावी देखील शोध घेतला. मात्र, दोघेही मिळून आले नाहीत. अखेर यातील ममरुद्दीन हा आरोपी रे रोड परिसरातील एका झोपडपीत राहत असल्याची माहिती गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या अधिकार्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला बुधवारी अटक केली. (प्रतिनिधी)