महामार्गावर अपघात; दोन ठार, ६ जखमी
By Admin | Updated: January 1, 2015 03:07 IST2015-01-01T03:07:59+5:302015-01-01T03:07:59+5:30
वॅगन आर आणि होंडा सिटीत झालेल्या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांच्या चालकांचा मृत्यू झाला. तर माजगावकर गंभीर जखमी झाले. अन्य ६ जणही जखमी झाले आहेत.

महामार्गावर अपघात; दोन ठार, ६ जखमी
कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटीनजीक धानीवरी येथे डहाणू उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जितेंद्र माजगावकर यांची वॅगन आर आणि होंडा सिटीत झालेल्या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांच्या चालकांचा मृत्यू झाला. तर माजगावकर गंभीर जखमी झाले. अन्य ६ जणही जखमी झाले आहेत.
मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या होंडा सिटी गाडीने मुंबईकडे जाणाऱ्या वॅगन आरला जोरदार धडक दिली. या अपघातात वॅगन आरचा चालक कमलेश पवार यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तर होंडा सिटी कारचा चालक करण दोषी यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या माजगावकर यांना ठाणे येथील जुपिटर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असून इतर सहा जणांवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विचित्र अपघातात एकाचा मृत्यू
मुंब्रा : ठाण्याहून पनवेलकडे जाणारा कंटेनर विरोधी दिशेकडून येणाऱ्या दोन वाहनांवर आदळल्यामुळे कंटेनरच्या बॅटरी बॉक्समध्ये स्पार्क झाला. वाहनांना लागलेल्या आगीत हकिम या वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर राम प्रसाद यादव आणि अन्य एक चालक जखमी झाला. ही घटना मुंब्रा बायपासवर मंगळवारी रात्री घडली.