‘एक्स्प्रेस-वे’वर अपघात
By Admin | Updated: September 5, 2014 02:21 IST2014-09-05T02:21:20+5:302014-09-05T02:21:20+5:30
मुंबई - पुणो एक्स्प्रेस-वेवर पहाटे सहाच्या वेळेस ट्रक, कंटेनर आणि बस या वाहनांमध्ये अपघात होऊन एकाचा मृत्यु झाला

‘एक्स्प्रेस-वे’वर अपघात
खालापूर : मुंबई - पुणो एक्स्प्रेस-वेवर पहाटे सहाच्या वेळेस ट्रक, कंटेनर आणि बस या वाहनांमध्ये अपघात होऊन एकाचा मृत्यु झाला. पुण्याहून मुंबईकडे ग्रेनाइट लादी घेवून जाणा:या ट्रकला सुसाट वेगात असणा:या कंटेनरने धडक दिली. यामुळे ट्रकमधील लादी रस्त्यावर पसरल्याने एक्सप्रेस वेवरील वाहतूक किमान दोन तास विस्कळीत झाली होती.
हा अपघातात इतका भीषण होता की कंटेनर चालक जागीच ठार झाला आहे. ट्रकला धडकल्यानंतर कंटेनरने वोल्व्हो बसला धडक दिली परंतु सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. यामुळे एक्सप्रेसवेवरील वाहतूक काहीकाळ खोपोली मार्गे वळविण्यात आली होती. गणोश विसर्जनाच्या दिवशी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने गणोशभक्तांना फटका बसला.
हैद्राबाद येथून लादी घेवून जाणारा ट्रक खोपोली एक्ङिाटला आल्यानंतर पाठीमागून कंटेनरने ट्रकला धडक दिली. त्यांनतर बाजुने जाणा:या खाजगी बसला ही कंटेनरची धडक बसली. अपघातात ट्रक मधील लादी रस्त्यावर पडल्याने दोन तास रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. दरम्यान वाहतूक विस्कळीत झाल्याने खोपोलीमार्गे पुणो महामार्गावरून वाहतूक वळविण्यात आली होती तर प्रवाशी बसच्या प्रथमदर्शनी भागाचे यामध्ये नुकसान झाले असून प्रवाशी सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर कंटेनर रस्त्यात आडवा झाल्याने त्याखाली चिरडून कंटेनर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला .अखेर बोरघाट पोलिस,डेल्टा आणि आयआरबीच्या मदतीने दोन तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. (वार्ताहर)
‘आयआरबी’ची ढिसाळ यंत्रणा
अपघातानंतर तातडीने रस्त्यात आडवी होणारी वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याच्या कामासाठी कायम लागणारी क्रेन अद्याप आयआरबीकडे नाही. यामुळे एक्स्प्रेस वेवर अपघातावेळी वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे. प्रत्येकवेळी पुणो येथील लोकमान्य हॉस्पिटलची क्रेनची मदत आयआरबीला घावी लागत असल्याने क्रेन घटनास्थळी पोहोचेर्पयत विलंब होत आहे. मुळात घाट सेक्शनला आयआरबीकडे स्वत:ची क्रेन असणो आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणो आहे. क्रेन चालक हा कधी रुग्णवाहिकेचा चालक असल्याने अनेकदा गैरसोय होत आहे.