चांदीप येथे अपघात; तीन गंभीर
By Admin | Updated: December 29, 2014 00:13 IST2014-12-29T00:13:51+5:302014-12-29T00:13:51+5:30
शिरसाड-अंबाडी मार्गावर चांदीप येथे ट्रकने प्रवासी रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालक विजय तरे (३५) रा. खानिवडे

चांदीप येथे अपघात; तीन गंभीर
पारोळ : शिरसाड-अंबाडी मार्गावर चांदीप येथे ट्रकने प्रवासी रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालक विजय तरे (३५) रा. खानिवडे व प्रवासी रमेश परेट (४५) व त्यांची पत्नी रेजना परेट (४५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने नालासोपारा येथील दवाखान्यात दाखल केले आहे.
शिवणसई येथून रिक्षा भाड्याने करून रमेश हे तांदूळ घेऊन हेदवडे या आपल्या गावी जात होते. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या रेती वाहतुकीच्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षातील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले व रिक्षा दूरवर फेकल्याने रिक्षाचेही नुकसान झाले.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक चालते. त्यामुळे रेती भरलेले ट्रक या मार्गावर आल्यानंतर पोलिसांच्या व महसूल अधिकाऱ्यांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी चालक हे ट्रक वेगाने हाकतात. त्यामुळे असे अपघात घडत असल्याचे नागरिकांचे मत आहे. पण, या अवैध रेती वाहतुकीलाही पोलिसी वा महसूल अधिकाऱ्यांची साथ असल्यामुळे दाद कुणाकडे मागायची, हा प्रश्न जनतेला सतावत आहे. (वार्ताहर)