Join us  

उत्तर मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित पुलांच्या कामाला गती द्या, भाजपा खासदारांचं आदित्य ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 12:21 AM

बोरिवली येथील कांदळवन उद्यानाच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष भेटीच्या वेळी मंत्री आदित्य ठाकरे आले होते. मुंबई शहरातील नागरिकांसाठी हे सर्व रेंगाळलेले प्रकल्प जर लवकर मार्गी लागले तर वाहतूक कोंडी दूर होऊन नागरिकांचा प्रवास सोईस्कर होईल यासंदर्भात खासदार शेट्टी यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती.

मुंबई - उत्तर मुंबईची लोकसंख्या सुमारे 25 लाखांच्या आसपास असून येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. उत्तर मुंबईला विशाल समुद्र किनारपट्टी लाभली असून मुंबई महानगर पालिकेच्या प्रस्तावित पूलांची कामे एनओसी अभावी गेली अनेक वर्षे रखडली आहेत. त्यामुळे येथील प्रस्तावित पूलांच्या कामांना गती मिळण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्याचे पर्यावरण,पर्यटन मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे. 

बोरिवली येथील कांदळवन उद्यानाच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष भेटीच्या वेळी मंत्री आदित्य ठाकरे आले होते. मुंबई शहरातील नागरिकांसाठी हे सर्व रेंगाळलेले प्रकल्प जर लवकर मार्गी लागले तर वाहतूक कोंडी दूर होऊन नागरिकांचा प्रवास सोईस्कर होईल यासंदर्भात खासदार शेट्टी यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी खासदार या नात्याने सदर पूलांच्या कामांना आवश्यक मंजुरी मिळविण्यासाठी सातत्याने पालिका प्रशासनाकडे प्रयत्न व पाठपुरावा केला आणि संबंधित अधिकाऱ्यांशी असंख्य बैठका घेतल्या आहेत.

प्रस्तावित मढ-वर्सोवा पूल, मार्वे-मनोरी  पूल, एवरशाइन नगर ते मार्वे रस्ता जवळील रामचंद्र नाल्यावरील पूल, लगून रोडपासून इन्फिनिटी मॉलपर्यंतचा पूल, मार्वे रस्त्यावरील धारीवली गावातील पूल आदी विविध पूलांची कामे गेली एनओसी अभावी गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत याकडे त्यांनी मंत्री ठाकरे यांचे लक्ष वेधले.

महाराष्ट्र कोस्टल झोन मेनेजमेंट अथोरिटी ( एमसीझेएमए) यांच्याशी दि,10 व दि,11 जून रोजी झालेल्या बैठकीत मुंबई मनपाने या सर्व विकास  प्रकल्पाला लागणाऱ्या आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र संबंधी माहिती दिली होती. मात्र त्यानंतर एमसीझेएमएची अजून एक ही बैठक झाली नाही. या विभागाच्या सदस्यांचा  कालावधीही समाप्त झाला असून, अजून नवीन समिती गठित करण्यात आली नाही किंवा जुने समितीच्या कार्यकाळ वाढवला नसल्याने या सर्व कामांसंदर्भात आवश्यक एनओसी रखडली आहे, असे खासदार शेट्टी यांनी मंत्री ठाकरे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाभाजपा