खासगी सोसायट्यांमधील लसीकरण मोहिमेला वेग, रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 22:28 IST2021-06-10T22:28:02+5:302021-06-10T22:28:26+5:30
"लस आपल्याला जवळ आणते" हे ब्रीद वाक्य घेऊन अंशुल प्लाझा या खासगी सोसायटीने ही लसीकरण मोहीम राबवली

खासगी सोसायट्यांमधील लसीकरण मोहिमेला वेग, रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबईतील आर मध्य विभागातील कांदिवली पश्चिम येथील अंशुल प्लाझा (अंशुल हाईट्स) को. ऑ. हाऊसिंग सोसायटीत सुराणा हॉस्पिटल व मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने गुरुवार 10 जून 2021 रोजी लसीकरणं मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. या लसीकरण मोहिमेला अंशुल प्लाझा सोसायटीतील तसेच आजूबाजूच्या खासगी सोसायटीतील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. VACCINES BRINGS US CLOSER - "लस आपल्याला जवळ आणते" हे ब्रीद वाक्य घेऊन ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
अंशुल प्लाझा सोसायटीतील सर्व तरुणांनी पुढाकार घेऊन ही लसीकरण मोहीम राबवली. या लसीकरण मोहिमेचा लाभ तरुण मुले मुली, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. 18 ते 44 वयोगट, 45 +, 60 + या वयोगटातील सुमारे 250 रहिवाशांनी लस घेऊन या लसीकरणं मोहिमेत सहभाग नोंदवला.
अंशुल प्लाझा सोसायटीतील राहणारे डॉक्टर्स व नर्सेस यांनीदेखील यासाठी सर्वोतोपरी मदत केली. कोविडचे आणि सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम शिस्तबद्ध व काटेकोरपणे पाळून ही मोहीम यशस्वी करण्यात आली.