Join us

मनसे नगरसेवक ‘खरेदी’ची एसीबी चौकशी , मुख्यमंत्री फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 05:09 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक आपल्याकडे घेताना शिवसेनेने या नगरसेवकांना कोट्यवधी रुपये दिल्याच्या आरोपाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खाते करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

विशेष प्रतिनिधीमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक आपल्याकडे घेताना शिवसेनेने या नगरसेवकांना कोट्यवधी रुपये दिल्याच्या आरोपाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खाते करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.खा.किरीट सोमय्या यांनी हे नगरसेवक कोट्यवधी रुपये देऊन शिवसेनेने खरेदी केल्याचा आरोप केला आहे. तशी तक्रारही सोमय्या यांनी एसीबीकडे केली आहे. त्यांच्या तक्रारीची एसीबी चौकशी करेल. सोमय्या यांनी आपल्याला भेटीची वेळ मागितलेली आहे. त्यांचे म्हणणे आपण ऐकून घेऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले.वर्षा निवासस्थानी दिवाळीनिमित्त आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मनसेच्या या सहा नगरसेवकांनी आधी भाजपात येण्यासाठी संपर्क साधला होता काय, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, राजकारणात सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, पण प्रत्येक हालचालींवरआमचे लक्ष असते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, एवढेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नारायण राणे यांचा नवा पक्ष भाजपाचा मित्रपक्ष झाला आहे. त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :मनसेदेवेंद्र फडणवीस