एसीबीने फाडला पोलिसांचा बुरखा
By Admin | Updated: August 6, 2014 02:31 IST2014-08-06T02:31:30+5:302014-08-06T02:31:30+5:30
एका इस्टेट एजंटविरोधात गँगरेपचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी देत खार पोलिसांनी 50 लाखांची लाच मागितल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे.

एसीबीने फाडला पोलिसांचा बुरखा
मुंबई : पैशांसाठी पोलीस काय करू शकतात याची प्रचिती काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खार पोलीस ठाण्यातील अधिका:यांवर केलेल्या कारवाईतून येते. बिल्डरच्या इशा:यावरून एका इस्टेट एजंटविरोधात गँगरेपचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी देत खार पोलिसांनी 50 लाखांची लाच मागितल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तक्रारदार इस्टेट एजंट असून त्यांचे खार येथील अरोरा टॉवरमध्ये कार्यालय आहे. इमारतीचे मालक विक्की अरोरा यांना ते परत हवे झाले. मात्र तक्रारदाराकडून विरोध होईल, सहजासहजी हे कार्यालय परत मिळणार नाही हे जाणून त्यांनी खार पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक महेंद्र नेर्लेकर, एपीआय सुभाष सामंत यांच्याशी हात मिळवणी करून एक कट आखला. अरोराने तक्रारदारासोबत मैत्री केली. त्याने तक्रारदाराला 4 जूनला डहाणू येथील आपल्या फार्म हाऊसवर नेले. तेथे त्याला दारू पाजली. पुढे तीन तरूणींना तेथे बोलावून घेतले. यापैकी एका तरूणीसोबत तक्रारदाराचे चाळे सुरू असताना अरोराने हा प्रकार छुप्या कॅमे:यात कैद करून घेतला. या घटनेनंतर तब्बल दीड महिन्यांनी खार पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सामंत यांनी तक्रारदाराला फोन करून तुमच्याविरोधात बलात्काराची तक्रार आली आहे. या गुन्हयाची चौकशी निरिक्षक नेर्लेकर करत आहेत. तुम्ही तातडीने त्यांना भेटा, असा निरोप दिला. नेर्लेकरने तक्रार अर्जासोबत जोडलेले नगA आणि नको त्या अवस्थेतले फोटो तक्रारदाराला दाखवले. त्यामुळे तक्रारदार घाबरले. पुढे नेर्लेकरने हे प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाख रूपये लागतील, अशी मागणी केली. यानंतर तक्रारदार वारंवार नेर्लेकरशी संपर्क साधण्याचा प्रय} केला. मात्र नेर्लेकर फोन उचलत नव्हता. तेव्हा तक्रारदाराने सामंतची भेट घेतली. तेव्हा सामंतने हे प्रकरण मिटविण्यासाठी तब्बल 5क् लाखांची मागणी केली. शिवाय अरोरा टॉवरमधले कार्यालय रिकामी करण्यास सांगितले. नंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली. एसीबीने नेर्लेकर, सामंत, आरोरा आणि या टोळीचे अन्य साथीदार महेश कांबळे, रॉबीन गोन्झाल्वीस यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला. दरम्यान, सामंत याने तक्रारदाराला कार्टर रोड येथील निवासस्थानी बोलावून घेतले होते. तेथे एसीबीने सापळा रचला होता.
सामंत पळाला, मात्र त्याची नवी कोरी आयटेन गाडी एसीबीने हस्तगत केली. गाडीच्या झडतीत सामुहिक बलात्काराची तक्रार करणारा अर्ज एसीबीच्या हाती लागला. (प्रतिनिधी)
बॉडी बिल्डर सामंतने अधिका:यांना रोखले
तक्रारदाराने सामंतची त्याच्या घरी भेट घेतली. सामंतने पैशांनी भरलेली बॅक, कागदपत्रे स्वीकारली. तेव्हा एसीबी अधिकारी घरात घुसणार इतक्यात सामंतला गडबड आहे, याची कुणकुण लागली. सामंत बॉडी बिल्डर आणि वेट लिफ्टर असल्याने त्याने जोर लावून दरवाजा बंद केला आणि अधिका:यांना घराबाहेर रोखले. तर एसीबी अधिकारी दरवाजा तोडून आत शिरण्याच्या धडपडीत होते. तेव्हा सामंत एसीच्या खिडकीतून उडी मारून पसार झाला.
सामंतच्या हाती फक्त वीसच हजार : आरोपी सामंतने तक्रारदाराकडे दहा लाखांचा पहिला हप्ता मागितला होता. एसीबीच्या सल्ल्याने नोटांच्या आकाराचे को:या कागदाची बंडले करण्यात आली. फक्त या बंडलांवर हजारची नोट जोडण्यात आली. त्यामुळे सामंतच्या हाती वीस हजार लागले, असे सांगण्यात आले. फरार सामंत याचा खार पोलीस आणि एसीबीकडून शोध सुरू आहे.