Join us

पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल झाली वर्षाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 06:22 IST

सर्वप्रथम पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला मंगळवारी वर्ष पूर्ण होत आहे. २५ डिसेंबर, २०१७ पासून पश्चिम रेल्वेने रेल्वे प्रवाशांना एसी लोकलच्या माध्यमातून थंडगार प्रवास करण्याची सोय उपलब्ध करून दिली.

मुंबई : सर्वप्रथम पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला मंगळवारी वर्ष पूर्ण होत आहे. २५ डिसेंबर, २०१७ पासून पश्चिम रेल्वेने रेल्वे प्रवाशांना एसी लोकलच्या माध्यमातून थंडगार प्रवास करण्याची सोय उपलब्ध करून दिली. वर्षभरात एसी लोकलमधून सुमारे ४० लाख प्रवाशांनी प्रवास केला. यात महिन्याला सरासरी ३ ते ४ लाख प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत १६ कोटी ६५ लाख रुपये जमा झाले. एसी लोकल सुरुवातीच्या काळात मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भार्इंदर, वसई रोड या स्थानकांवर थांबायची. यात बोरीवली स्थानकाज सर्वाधिक उत्पन्न मिळत आहे. त्यानंतर मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, दहिसर, मीरा रोड, नायगाव, नालासोपारा या सात स्थानकांवर तिला थांबा मिळाल्याने प्रवाशांत वाढ झाली. यामुळे पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत ३३ लाख ७६ हजार रुपये जमा झाले. या सात स्थानकांपैकी मीरा रोड स्थानकावर सर्वाधिक उत्पन्न जमा होते.

टॅग्स :एसी लोकलमुंबई लोकल