Join us

AC Local: प. रेल्वे एसी लोकलच्या आठ फेऱ्या वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 12:48 IST

AC Local: एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पश्चिम रेल्वेने २० जूनपासून आणखी ८ एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई : एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरीलएसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पश्चिम रेल्वेने २० जूनपासून आणखी ८ एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. एसी लोकलच्या तिकीट भाड्यात कपात होण्यापूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज २० एसी लोकल फेऱ्या सुरू होत्या.  ५ मे रोजी एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर एसी लोकलची प्रवासी संख्या वाढली. त्यामुळे आता पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल फेऱ्यांची संख्या ३२ वरून ४० पर्यंत पोहोचली आहे. या नव्या आठ एसी लोकल फेऱ्यांपैकी चार फेऱ्या डाउन आणि चार अप दिशेने धावणार आहेत. ज्यात विरार ते चर्चगेट, विरार ते दादर, वसई ते चर्चगेट, मालाड ते चर्चगेटदरम्यान अप दिशेने प्रत्येकी एकेक एसी लोकल धावेल. डाउन मार्गावरील दादर ते विरार, चर्चगेट ते विरार, चर्चगेट ते वसई आणि चर्चगेट ते मालाडदरम्यान प्रत्येकी एक एसी लोकलची फेरी धावेल.

एकूण ४० एसी लोकल फेऱ्या धावणारएसी लोकलची वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता पश्चिम रेल्वेने सोमवारपासून ८ अतिरिक्त एसी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सोमवार ते शुक्रवारपर्यंत पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण ४० एसी लोकल फेऱ्या धावणार आहेत, तर शनिवार-रविवार ३२ एसी लोकल फेऱ्या धावणार आहेत.

टॅग्स :एसी लोकलपश्चिम रेल्वेमुंबई उपनगरी रेल्वे