Join us

एसी लोकलला लागली गळती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 23:26 IST

वातानुकूलित लोकलमधून पावसाचे पाणी गळत असल्याची घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे.  

मुंबई : वातानुकूलित लोकलमधून पावसाचे पाणी गळत असल्याची घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे.   हरिश परिहार या तरुणाने ट्विटर अकाउंट वरून वातानुकूलित लोकलच्या छतामधून पाणी गळत असल्याचे निदर्शनास आणून दिले. बोरीवली  येथील 7.54 च्या लोकलमध्ये ही घटना घडली. हे ट्विट पश्चिम रेल्वे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना टॅग करण्यात आले होते. प्रवाशांच्या तक्रारी नुसार लोकलच्या छतामध्ये दुरुस्ती करण्यात आली असून पाणी गळती थांबवण्यात आली आहे.दुरुस्तीनंतर पुन्हा वातानुकूलित लोकल पून्हा सेवेत दाखल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली

टॅग्स :एसी लोकल