विमानतळावर महिलेचे जवानासोबत गैरवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:07 IST2021-03-16T04:07:26+5:302021-03-16T04:07:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विमानतळावर एका महिलेने सीआयएसएफ जवानासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महिलेला अटक ...

Abuse of a woman with a soldier at the airport | विमानतळावर महिलेचे जवानासोबत गैरवर्तन

विमानतळावर महिलेचे जवानासोबत गैरवर्तन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विमानतळावर एका महिलेने सीआयएसएफ जवानासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महिलेला अटक करून सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ती पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे.

संबंधित महिला मुंबईहून बंगळुरूला जात होती. परंतु, ती टर्मिनल एकवर पोहोचण्याएवजी टर्मिनल २वर (आंतरराष्ट्रीय) पोहोचली. तेथे तैनात असलेले सीआयएसएफचे जवान उमाशंकर शुक्ला यांनी तिला चुकीच्या ठिकाणी आल्याचे सांगितले. तरीही तिने आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शुक्ला यांनी तिला अडवले असता तिने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तिचे विमान उड्डाण होण्यास अद्याप तासाभराचा अवधी असल्याचे सांगून शुक्ला यांनी तिला टर्मिनल एकवर जाण्याची विनंती केली. मात्र, तिने त्यांचा सल्ला ऐकण्याऐवजी त्यांच्या कानशिलात लगावली. अन्य सुरक्षारक्षकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता ती शुक्ला यांच्या अंगावर थुंकल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित महिलेला अटक करून सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Abuse of a woman with a soldier at the airport