Join us
Daily Top 2Weekly Top 5

गैरहजर बेस्ट कामगारांना शून्य पगार?; कृती समितीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:20 IST

पुन:श्च हरिओममुळे खासगी व सरकारी कार्यालये सुरू झाल्याने सर्व ताण बेस्ट बसगाड्यांवर

मुंबई : कामावर गैरहजर राहणाऱ्या सुमारे एक हजार बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे. मात्र यापैकी अनेक कर्मचाºयांच्या वेतनात मोठी कपात करण्यात आली आहे. हजारो कर्मचाºयांना शून्य वेतन देण्यात आल्याचा आरोप बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने केला आहे. प्रशासनाच्या कारवाईविरोधात बेस्ट कामगारांचे आंदोलन प्रत्येक बस आगारात सुरू आहे.लॉकडाऊनच्या काळात मुंबईत लोकल सेवाही बंद असताना बेस्ट बस रस्त्यावर धावत होती. याचा मोठा दिलासा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना मिळाला. मात्र पुन:श्च हरिओममुळे खासगी व सरकारी कार्यालये सुरू झाल्याने सर्व ताण बेस्ट बसगाड्यांवर पडत आहे. त्यामुळे सर्व कर्मचाºयांना कामावर तात्काळ रुजू होण्याची ताकीद बेस्ट प्रशासनाने दिली आहे.बेस्ट उपक्रमातील ४०५ कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५८ कर्मचाºयांचा मृत्यू झाला असल्याचा दावा बेस्ट कामगार संघटनांनी केला आहे. परंतु केवळ आठ कर्मचारी मृत्युमुखी पडल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याबेस्ट