फरार गुंड नितीन गवाणकर याला अटक
By Admin | Updated: October 6, 2015 02:51 IST2015-10-06T02:51:39+5:302015-10-06T02:51:39+5:30
जैतापूर येथील प्रकल्पग्रस्तांना वेगवेगळ्या माध्यमातून त्रास देणारा फरार व स्वयंघोषित समाजसेवक नितीन गवाणकर याला अखेर अंधेरी पोलिस ठाण्याने मुंबईत जबरी चोरीच्या
_ns.jpg)
फरार गुंड नितीन गवाणकर याला अटक
मुंबई : जैतापूर येथील प्रकल्पग्रस्तांना वेगवेगळ्या माध्यमातून त्रास देणारा फरार व स्वयंघोषित समाजसेवक नितीन गवाणकर याला अखेर अंधेरी पोलिस ठाण्याने मुंबईत जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असून न्यायालयाने १६ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा ११६/१९९४ च्या कलम ३९४, ११४ अन्वये जबरी चोरीचा गुन्हा नितीन तुकाराम गवाणकर याच्याविरोधात नोंदवून १८ मार्च १९९४ रोजी अटक झाली होती. त्यानंतर २५ मार्च १९९४ रोजी जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर त्याने पत्ता बदलला व न्यायालयापासून दडवून ठेवला. त्यामुळे पोलिसांना तो सापडत नव्हता. अखेर २९ मार्च २०१३ रोजी त्याला फरार घोषित केले. त्यानुसार पोलिसांनी दहिसर येथे त्याला अटक केली व ५४४-२०१५ कलम२२६ अ सह १७४ अ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानतंर वांद्र येथील न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. (प्रतिनिधी)