Join us  

सरकारला मिळाले ८६५ कोटी मुद्रांक शुल्क, फेब्रुवारीत ११,७४२ मालमत्तांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 9:46 AM

एका महिन्यात ११ हजार मालमत्तांची विक्री हा गेल्या १२ वर्षांतील उच्चांक ठरला आहे. 

मुंबई : नववर्षाच्या दुसऱ्या महिन्यातही मुंबई व उपनगरातील मालमत्तांच्या खरेदीचा जोर कायम असून, फेब्रुवारी महिन्यात ११ हजार ७४२ मालमत्तांची विक्री झाली आहे. यामध्ये ८० टक्के मालमत्ता या निवासी स्वरूपाच्या आहेत, तर २० टक्के मालमत्ता या व्यावसायिक स्वरूपाच्या आहेत. एका महिन्यात ११ हजार मालमत्तांची विक्री हा गेल्या १२ वर्षांतील उच्चांक ठरला आहे. 

जानेवारी महिन्यात मुंबईत १०,९६७ मालमत्तांची विक्री झाली होती. बांधकाम उद्योगातील अग्रगण्य नाइट फ्रँक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मालमत्ता विक्रीमध्ये २१ टक्के वाढ नोंदली गेली आहे.

१११२ कोटी २८ दिवसांत शुल्क :

१)  गेल्या फेब्रुवारीमध्ये मुंबई व उपनगरात ९६८४ मालमत्तांची विक्री झाली होती. 

२)  अर्थात, यावर्षीच्या फेब्रुवारीमध्ये मालमत्ता विक्रीचा आकडा जरी जास्त असला तरी गेल्या फेब्रुवारीच्या तुलनेत यंदा मुद्रांक शुल्कापोटी मिळालेल्या रकमेत मात्र घट झाली आहे.

३)  गेल्या वर्षी राज्य सरकारला फेब्रुवारी महिन्यातील मालमत्ता विक्रीद्वारे १११२ कोटी रुपये मुद्रांक शुल्कापोटी मिळाले.

४) ४५% एकूण विक्रीमध्ये ५०० चौरस फूट व त्या खालील आकारमानाचे प्रमाण आहे.

५) ४२% एकूण विक्रीमध्ये ५०० ते एक हजार चौरस फुटांच्या घरांचे प्रमाण आहे.

शहराऐवजी उपनगरांना पसंती :

यंदाच्या फेब्रुवारीमध्ये ८६५ कोटी रुपये मिळाले आहेत. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये ज्या निवासी मालमत्तांची खरेदी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे ५०० चौरस फूट व त्या खालील आकारमानाचे आहे. एकूण विक्रीमध्ये हे प्रमाण ४५ टक्के इतके आहे. तर, ५०० ते एक हजार चौरस फूटांच्या मालमत्तेच्या विक्रीचे प्रमाण हे ४२ टक्के इतके आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण ४५ टक्के इतके होते. त्यामध्ये घट झाली आहे. मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व व पश्चिम उपनगरात विक्री झालेल्या मालमत्तांची टक्केवारी ७३ टक्के इतकी आहे.

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योग