Join us  

तलावांमध्ये पन्नास टक्के जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 1:30 AM

मुसळधार पावसामुळे तलावांमध्ये दररोज सरासरी ३० ते ४० हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा होत आहे.

मुंबई : मुसळधार पावसामुळे तलावांमध्ये दररोज सरासरी ३० ते ४० हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा होत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव आता निम्मे भरले आहेत. यापैकी तुळशी तलाव भरून वाहत असून लवकरच विहार तलाव भरण्याची शक्यताआहे.गेल्या वर्षी याच दरम्यान तलावांमध्ये ५४ टक्के जलसाठा जमा झाला होता. या वर्षी पावसाने जून महिन्यात काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून पावसाने दमदार इनिंग सुरू ठेवली आहे. त्यामुळे जलसाठा झपाट्याने वाढत आहे. पावसाळ्याचे आणखी अडीच महिने शिल्लक असल्याने तलाव काठोकाठ भरण्याची आशा आहे.मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो. वर्षभरहा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक असते. त्यानुसार आजच्या घडीला तलावांमध्ये निम्मा म्हणजे ७ लाख १९ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे.>जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)तलाव कमाल किमान आजची स्थितीमोडक सागर १६३.१५ १४३. २६ १६१.५६तानसा १२८.६३ ११८.८७ १२६.३४विहार ८०.१२ ७३.९२ ७९.७१तुळशी १३९.१७ १३१.०७ १३९.२२अपर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ५९८.५७भातसा १४२.०७ १०४.९० १२२.९५मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २७०.२४

टॅग्स :धरण