Join us  

Abhishek Bachchan Corona : बिग बी अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता अभिषेक बच्चन सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 11:53 PM

अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षण दिसत होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ची कोरोनाची चाचणी करुन घेतली.

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात स्वत: अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच, अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहे.

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षण दिसत होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ची कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले. यांदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. 

 

“माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच माझ्या कुटुंबाला आणि घरातील इतर स्टाफच्याही कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही,” असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे. याशिवाय, गेल्या दहा दिवसात माझ्या संपर्कात जे व्यक्ती आले त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करावी,” असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

याचबरोबर, अभिषेक बच्चन यानेही ट्विटकरून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. “माझ्या आणि माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आमच्या दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षण आहेत.सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत,” अशी माहिती ट्विट करत अभिषेक बच्चन यांनी दिली. याशिवाय, अभिषेक बच्चनची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन, आई जया बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चना यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आम्ही संपर्कात असून त्यांना सहकार्य करत आहे, असेही अभिषेक बच्चनने म्हटले आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी रिट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे. 

टॅग्स :अभिषेक बच्चनमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसअमिताभ बच्चन