अभिजीतचा तोल सुटला, महिला पत्रकारावर आक्षेपार्ह टिवट

By Admin | Updated: July 3, 2016 15:05 IST2016-07-03T14:47:10+5:302016-07-03T15:05:35+5:30

सतत वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत रहाणारा गायक अभिजीतने पुन्हा एकदा महिला पत्रकाराविषयी आक्षेपार्ह टिवट केले आहे.

Abhijit's balance was resolved, objectionable tweet on female journalist | अभिजीतचा तोल सुटला, महिला पत्रकारावर आक्षेपार्ह टिवट

अभिजीतचा तोल सुटला, महिला पत्रकारावर आक्षेपार्ह टिवट

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३ - सतत वादग्रस्त टि्वट करुन चर्चेत रहाणारा गायक अभिजीतने पुन्हा एकदा महिला पत्रकाराविषयी आक्षेपार्ह टि्वट केले आहे. चेन्नईमध्ये इन्फोसिसची कर्मचारी एस स्वातीची हत्या लव्ह जिहादाचा विषय असून, हिंदू पालकांना स्वातीसाठी न्याय हवा आहे असे टि्वट अभिजीतने केले. 
 
त्याने पीएमओच्या टि्वटर हँण्डललाही हे टि्वट केले. अभिजीतच्या या टि्वटवर पत्रकार स्वाती चर्तेुवेदी यांनी आक्षेप घेतला. अभिजीत जातीय दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत असून पोलिस त्याच्यावर कारवाई का करत नाहीत ? असा प्रश्न विचारला. यावर संतापलेल्या अभिजीतने महिला पत्रकारावर अत्यंत वाईट शब्दात टीकाटीप्पणी केली. 
 
अभिजीतच्या या टि्वटवर अनेकांनी संताप व्यक्त करताना त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांनी स्वाती चर्तेुवेदी यांना तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणात अभिजीतवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. याआधी सलमान खानच्या सुटकेच्या निकालानंतरही अभिजीतने वादग्रस्त टि्वट केले होते. 
 

Web Title: Abhijit's balance was resolved, objectionable tweet on female journalist