पणजी-गोवाच्या आयकर आयुक्तपदी अभिजित पाटणकर
By Admin | Updated: September 28, 2015 02:12 IST2015-09-28T02:12:27+5:302015-09-28T02:12:27+5:30
मुंबईचे अतिरिक्त आयुक्त अभिजित पाटणकर (आय.आर.एस) यांची पणजी-गोवा विभागाचे आयकर आयुक्त म्हणून पदोन्नती झाली आहे.

पणजी-गोवाच्या आयकर आयुक्तपदी अभिजित पाटणकर
मुंबई : मुंबईचे अतिरिक्त आयुक्त अभिजित पाटणकर (आय.आर.एस) यांची पणजी-गोवा विभागाचे आयकर आयुक्त म्हणून पदोन्नती झाली आहे.
अभिजित पाटणकर हे नागपूर येथील कॉमर्स आणि विधी महाविद्यालयातून १९९३ मध्ये प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने एल.एल.बी. परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्या परीक्षेत त्यांना अनेक गुणवत्ता पदके प्राप्त झाली होती.
१९९४ च्या आय.आर.एस. चमूतील ते सर्वात तरुण अधिकारी आहेत.
सेवानिवृत्त आय.ए.एस. अधिकारी अरुण पाटणकर यांचे ते चिरंजीव आहेत. (प्रतिनिधी)