Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरेत १२ वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला; मुलावर रुग्णालयात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 22:57 IST

गेल्या दीड महिन्यातील बिबट्याचा सातवा हल्ला

मुंबई-आरेत आज पुन्हा युनिट क्रमांक 13 येथे 12 वर्षांच्या धनुष या मुलावर आज रात्री बिबट्याने जोरदार हल्ला केला आणि त्याला रक्तबंबाळ केले. येथील रहिवाश्यांमी ट्रॉमा सेंटर मध्ये उपचारासाठी नेले आहे.

येथे प्रामुख्याने दाक्षिणात्य नागरिकांची वस्ती असून या वस्ती लगत डोंगराळ भाग आहे. गेल्या दीड महिन्यातील बिबट्याचा हा सातवा हल्ला आहे.लोकमत ऑनलाईन आणि लोकमतमध्ये सातत्याने बिबट्याच्या बातम्या प्रसिद्ध करून वनखाते आणि शासनाचे लक्ष वेधले आहे.

आरेत बिबट्याचे सतत होणारे हल्ले यामुळे नागरिकांमध्ये घाबराट पसरली असून आता वन खात्याने येथील बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश धुरी यांनी केली आहे.

येथे जरी एका बिबट्याच्या बछड्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले,तर एका बिबट्याच्या बछड्याला स्थानिकांनी पकडून वनखात्याच्या हवाली केले होते.मात्र अजूनही येथे किमान 6 ते 7 बिबटे आहेत.त्यामुळे बिबट्या कधी येईल आणि कधीही  हल्ला करेल याचा नेम नसल्याचे निलेश धुरी यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :बिबट्या