Join us

आरे आग; मालकावर गुन्हा दाखल करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 06:03 IST

आरेत नॅशनल पार्कच्या डोंगराला सोमवारी आग लागली. या आगीत येथील ३ ते ४ किमीच्या पट्ट्यातील वनसंपदा, भस्मसात झाली.

मुंबई : आरेत नॅशनल पार्कच्या डोंगराला सोमवारी आग लागली. या आगीत येथील ३ ते ४ किमीच्या पट्ट्यातील वनसंपदा, भस्मसात झाली. गुरुवारी दुपारी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रथमदर्शनी आग लागली नसून लावण्या आली असल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणी मॅनेजरवर नव्हेतर, मालकावर गुन्हा दाखल करा, असा आदेश त्यांनी पोलिसांना दिला.पाहणीदरम्यान कदम यांनी आगीत किती झाडे भस्मसात झाली, किती बुंधे शिल्लक आहेत याची मोजणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश वनखाते, पालिकेला दिले. आग लावल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने येथील मॅनेजरवर नव्हे, तर जागा मालकावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश त्यांनी पोलिसांना दिला. आगीमागे बिल्डर लॉबी, भूमाफियांच्या टोळीचे लागेबंधे असल्याचा संशय आहे. पोलीस, पालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत. दोषी कितीही मोठा असला तरी शासन कडक कारवाई करेल, असेही ते म्हणाले.>होर्डिंग्जद्वारे मनसेने व्यक्त केला संशयमनसेचे रहेजा इन्फिनिटी आयटी पार्क आणि न्यू म्हाडा कॉलनी व नागरी निवारा जंक्शनवरील डॉ. आंबेडकर चौकातील दोन होर्डिंग्ज नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मनसेचे दिंडोशी विभाग अध्यक्ष अरुण सुर्वे यांनी लावलेल्या होर्डिंग्जमध्ये आरे डोंगराला आग लागली की लावली, असा सवाल उपस्थित केला आहे. वनजमिनी बळकावण्याचा हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

टॅग्स :आरेरामदास कदम