Join us

आमीर खानला माहित नाही महिला क्रिकेट संघाच्या कर्णधाराचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 14:40 IST

दंगल चित्रपटातून महिला खेळाडूंवर भाष्य करणा-या मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला महिला क्रिकेट संघाच्या कर्णधाराचं साधं नाव माहित नाही

मुंबई - दंगल चित्रपटातून महिला खेळाडूंवर भाष्य करणा-या मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला महिला क्रिकेट संघाच्या कर्णधाराचं साधं नाव माहित नाही. एक संवेदनशील अभिनेता म्हणून ओळखला जाणारा आमीर खान तसं पहायला गेलं तर प्रत्येक विषयात सहभागी असतो. राजकारणापासून ते खेळापर्यंत सर्व विषयांवर तो चर्चा करताना दिसतो. पण महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूचं नाव तो सांगू न शकल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. 

आमीर खान दंगल गर्ल जायरा वसीमसोबत सध्या आपला आगामी चित्रपट 'सीक्रेट सुपरस्टार'च्या प्रमोशनात व्यस्त आहे.  चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आमीर खान आणि जायरा दोघेही भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणारा तिसरा टी-20 सामना पाहण्यासाठी आले होते. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडिअममध्ये हा सामना होता. पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. मात्र यादरम्यान आमीर खान आणि जायराने माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागसोबत गप्पा मारल्या. विरेंद्र सेहवागने त्यांना क्रिकेटसंबंधी काही प्रश्न विचारले. यावेळी महिला क्रिकेट संघाचा कर्णधार कोण आहे ? असं विचारलं असता आमीर खान मिताली राजचं नाव सांगू शकला नाही. 

आमीर खान आणि जायरासोबत जतीन सप्रू आणि विरेंद्र सेहवाग यांनी स्टेडिअममध्ये काही वेळ गप्पा मारल्या. यावेळी आमीरसोबत आगामी चित्रपट 'सीक्रेट सुपरस्टार' संबंधी चर्चा करण्यात आली. दरम्यान आमीरला महिला क्रिकेट संघाच्या कर्णधाराचं नाव विचारण्यात आलं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमीर प्रश्नाचं उत्तरच देऊ शकला नाही. 

जतीन सप्रूने आमीर आणि जायरोसबत रॅपिड फायर राऊंड खेळला. यावेळी त्याने दोघांनाही क्रिकेटसंबंधी प्रश्न विचारले. यामधील एक प्रश्न मिताली राजसंबंधी होती. पण आमीर उत्तर देण्यात अयशस्वी ठरला. मला नाव माहित आहे, पण आठवत नाहीये असं आमीर सांगत होता. जतीन सप्रूने यावेळी हिंट्सदेखील दिले, पण यानंतरही दोघेजण उत्तर देऊ शकले नाही.  

टॅग्स :आमिर खानमिताली राज