गणेश विसर्जनासाठी गेलेला तरुण बुडाला, आज मृतदेह सापडला
By पंकज पाटील | Updated: January 27, 2023 17:11 IST2023-01-27T17:11:27+5:302023-01-27T17:11:45+5:30
एमआयडीसीतील जीआयपी टॅंकमध्ये उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

गणेश विसर्जनासाठी गेलेला तरुण बुडाला, आज मृतदेह सापडला
अंबरनाथ: माघी गणेशोत्सवातील गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी आनंदनगर एमआयडीसीतील जीआयपी टॅंकमध्ये उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. आज या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
माघी गणेशोत्सव निमित्त ठाण्याच्या कोपरी भागातून गणेश पराग हा आपल्या नातेवाईकांकडे अंबरनाथ मध्ये आला होता. 26 जानेवारीला सायंकाळी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह गणेश देखील जीआयपी टॅंकवर गेला होता. यावेळी कुटुंबीय गणेश मूर्तीचे विसर्जन करून पुन्हा पाण्याबाहेर येत असताना गणेश पराग हा पाण्यात उतरला.
यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी देखील कुठे चालला आहेस अशी विचारणा केली असता त्याने लगेच येतो असे सांगून खोल पाण्यात गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो या डॅम मध्ये बुडाला. गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी आलेल्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही क्षणातच दिसेनासा झाला. 26 जानेवारीला सायंकाळी अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्यांना सापडला नाही. अखेर आज दुपारी गणेश याचा मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांना सापडला.