Join us
Daily Top 2Weekly Top 5

कामाठीपुऱ्यातल्या वास्तवाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 12:37 IST

गर्भश्रीमंत, श्रीमंत, लब्धप्रतिष्ठित, उच्च मध्यम, कनिष्ठ मध्यम अशा सर्वच वर्गांतील लोकांनी कायम अव्हेरलेला, ऑप्शनला टाकलेला विषय म्हणजे महानगरांमधल्या बदनाम गल्ल्या.  मुंबई महानगरीच्या पोटात अशा कितीतरी बदनाम गल्ल्या विसावल्या आहेत.

- सुधीर जाधवगर्भश्रीमंत, श्रीमंत, लब्धप्रतिष्ठित, उच्च मध्यम, कनिष्ठ मध्यम अशा सर्वच वर्गांतील लोकांनी कायम अव्हेरलेला, ऑप्शनला टाकलेला विषय म्हणजे महानगरांमधल्या बदनाम गल्ल्या.  मुंबई महानगरीच्या पोटात अशा कितीतरी बदनाम गल्ल्या विसावल्या आहेत. त्यातलाच एक परिसर म्हणजे कामाठीपुरा. तब्बल १४ गल्ल्यांमध्ये पसरलेल्या कामाठीपुराचा उल्लेख होताच प्रत्येकाचे कान टवकारतात. कामाठीपुऱ्यात जाण्यास भलेभले टरकतात.

कामाठीपुऱ्याच्या या गल्ल्यांमध्ये हाडामांसाची माणसंच राहतात. मात्र, त्यांचं भावविश्व वेगळं आहे. या १४ गल्ल्यांमध्ये नेमकं चालतं तरी काय, काय असतात इथल्या लोकांचे दैनंदिन व्यवहार, त्यांचं जीवनमान असतं तरी कसं, कोण चालवतं इथलं अर्थचक्र, मुंबई महानगराच्या इतिहासात कामाठीपुऱ्याचं स्थान तरी काय, या व अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतात. कामाठीपुऱ्यातील सर्व व्यवहारांवर झगझगीत प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकात वास्तवाचे दर्शन आहे.

 

टॅग्स :मुंबई