लॉस एंजेलिसहून "सुरांची शाळा", १७ वर्षांच्या मिश्का ओसवानीचं अद्वितीय योगदान!
By मनोहर कुंभेजकर | Updated: September 28, 2025 16:56 IST2025-09-28T16:55:01+5:302025-09-28T16:56:38+5:30
बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सचिन गवळी यांनी तिच्या कार्याची दखल घेत तिचे आभार मानले आहेत.

लॉस एंजेलिसहून "सुरांची शाळा", १७ वर्षांच्या मिश्का ओसवानीचं अद्वितीय योगदान!
मनोहर कुंभेजकर, मुंबई- १७ वर्षीय मिश्का ओसवानी ही अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये राहणारी, पण मनानं पूर्णतः भारतीय आहे! तिच्या "म्युझिक मॅटर्स" या सामाजिक उपक्रमांतर्गत,तिने आतापर्यंत मुंबईतील सुमारे ५० अनुदानित आणि गरजू शाळांना संगीत वाद्यं विनामूल्य दिली आहेत.भारतातील विद्यार्थ्यांसाठी संगीत हा केवळ विषय नाही, तर त्यांच्या आत्मविश्वासाचा स्रोत आहे. मी हे कार्य पुढेही सुरूच ठेवणार असल्याचे तीने सांगितले.
ज्या शाळांमध्ये पूर्वी कोणतीही संगीतसाधने नव्हती. सुरेल शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगून, मिश्का या शाळांना ८० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतची वाद्यं मोफत देते.या संस्थेच्या माध्यमातून ती कार्य करत असून, अनेक विद्यार्थ्यांना संगीत शिकण्याची नवी संधी मिळते.बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सचिन गवळी यांनी तिच्या कार्याची दखल घेत तिचे आभार मानले आहेत.
एक किशोरी, एक स्वप्न, आणि हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात भरलेली सुरांची झुळूक — मिश्का ओसवानी, खरंच तू भारताच्या सुरांची दूत आहेस अश्या शब्दात गवळी यांनी तिच्या कार्याचा गौरव केला.