शिवाजी पार्क येथील गोल्ड मॅन, जगण्यासाठी बनतो पुतळा...

By मनीषा म्हात्रे | Updated: January 2, 2025 14:41 IST2025-01-02T14:39:23+5:302025-01-02T14:41:22+5:30

मूळचा छतीसागडचा रहिवासी असलेल्या राहुल नट (२४) याने आई - वडिलांसह २००४मध्ये मुंबई गाठली. पनवेलमध्ये भाड्याच्या घरात तो कुटुंबीयांसोबत राहतो.

A statue is made to live | शिवाजी पार्क येथील गोल्ड मॅन, जगण्यासाठी बनतो पुतळा...

शिवाजी पार्क येथील गोल्ड मॅन, जगण्यासाठी बनतो पुतळा...

मुंबई : कामानिमित्त मुंबई गाठली. डोंबाऱ्याच्या खेळावर आयुष्य जगत असतानाच झटपट पैशांसाठी चोरी केली आणि अटकही झाली. मात्र, ती वाट चुकीची होती म्हणून काही तरी वेगळं करण्यासाठी धडपड सुरू झाली. शिक्षण कमी, त्यात स्वतःची वेगळी ओळख करायची म्हणून परदेशातील गोल्ड मॅन मनाला भावाला. त्यानुसार, जगण्यासाठी पुतळा बनत असल्याचे शिवाजी पार्क येथील गोल्ड मॅन म्हणून ओळखला जाणारा राहुल सांगतो. 

मूळचा छतीसागडचा रहिवासी असलेल्या राहुल नट (२४) याने आई - वडिलांसह २००४मध्ये मुंबई गाठली. पनवेलमध्ये भाड्याच्या घरात तो कुटुंबीयांसोबत राहतो. राहुल सांगतो की, पोटाची भूक तुम्हाला अनेक वाटा दाखवते. आपण कुठल्या मार्गाने जायचे, हे आपणच ठरवायला हवे. अशात माझी वाट भरकटली. 

-  चोरी केली आणि अडकलो. अटक झाली शिक्षा भोगली. अजूनही कोर्टात प्रकरण सुरू आहे. मात्र, ही वाट चुकीची होती, याची जाणीव झाली. 
-  खरं तो शॉर्ट कट मला अनेक गोष्टी शिकवून गेला. त्यानंतर, सोशल मीडियावर शोध सुरू असताना गोल्डमॅन आवडला. 
-  मीही कुटुंबीयांसोबत वेगवेगळे साहसी खेळ खेळलो. ॲक्टिंग केली. यातूनच मीही सोनेरी रंग चढवून एकच ठिकाणी थांबण्याचे ठरवले.
-  सुरुवातीपासूनच लोकांचा चांगला प्रतिसाद पाहून आत्मविश्वास वाढला आणि समाधानही मिळाले.
-  मेहनतीच्या पैशांची किंमत कळली, असे त्याने आपले अनुभव सांगितले. मुंबईत माझ्यासारखे १२०हून अधिक जन असल्याचेही तो सांगतो.

अवघ्या २५ सेकंदांचा ब्रेक
राहुल हा २०२१ पासून शिवाजी पार्क येथे सकाळी ११:०० वाजल्यापासून रात्री ११:०० वाजेपर्यंत उभा राहतो. या बारा तासांमध्ये तो तासाभराने २५ सेकंदाचा ब्रेक घेतो. 
बघायला सोप असेल तरी त्यामागे खूप मेहनत आहे. एखाद्या पुतळ्यासारखं कोणी कितीही बोलण्याचा, हसवण्याचा प्रयत्न केला तरी फक्त स्थिर थांबणे अवघड आहे. 
ऊन, पावसाची तमा न बाळगता तो पुतळा बनून उभा असतो. अनेक जण सेल्फी घेतात. काही जण कलेची दाद देत पैसे देतात. त्यातूनच माझ्यासह माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अनेकदा काही पोलिसदेखील मला पैसे देऊन जातात, असे राहुलने सांगितले. 

Web Title: A statue is made to live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई