Join us

आले रे आले...मुंबई पोलीस...! पोलिसांनी पोलिसांसाठी बनवलेलं सुपरहिट गाणं व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 10:20 IST

१४ तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखाहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. तर १६ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहे

मुंबई - देशासह जगभरात विख्यात असलेल्या मुंबई पोलीस दलाची किर्ती सातासमुद्रापलीकडे असल्याचं बोललं जाते. दिवसरात्र मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या शहराच्या रक्षणासाठी कायम सज्ज असणाऱ्या या पोलिसांच्या सन्मानासाठी एक गाणं तयार करण्यात आले आहे. हे गाणे मुंबई पोलिसांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले असून एका पोलीस कर्मचाऱ्यानेच हे गाणं लिहिलं आहे. 

या गाण्याचं टायटल आहे आले रे आले मुंबई पोलीस..पोलीस कॉन्स्टेबल मयूर राणे यांनी लिहिलेलं गाणं मुंबई पोलिसांचे शौर्य, वीरता आणि कटिबद्धता याचं उदाहरण मानलं जाते. हे गाणे ऐकून तुमच्याही मनात अभिमानाची भावना नक्कीच जागृत होईल. या व्हिडिओच्या चित्रिकरणात विविध पदावरील आणि खात्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आले आहे. त्यात शहरातील नागरिकांना भयानक परिस्थितीतही पोलीस कसे मदत करतात हे दाखवलं आहे. 

१४ तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखाहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. तर १६ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहे. या व्हिडिओवर लोकांच्याही अनेक प्रतिक्रिया आहे. एका युझरने मुंबई पोलिसांचे काम चांगले आहे. मी मुंबईकर असल्याचा गर्व आहे असं लिहिलंय तर दुसऱ्याने गाण्यातील प्रत्येक शब्दावरून मुंबई पोलिसांची किर्ती ऐकायला मिळते. हे गाणे ऐकून भारी वाटतं असं लिहिलं आहे. 

दरम्यान, मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच असा म्युझिक व्हिडिओ शेअर केलाय असं नाही. मुंबई पोलिसांचा एक बँड विभाग आहे. ज्याला खाकी स्टुडिओ म्हटलं जाते. हा मुंबई पोलीस दलातील विविध कर्मचाऱ्यांचा समुह आहे. जे हिट ट्रॅक आणि सुंदर संगीत वाजवण्याचे काम करते. अनेकदा या टीमचा परफॉर्मन्स सोशल मीडियात पाहायला मिळतो. 

टॅग्स :मुंबई पोलीस