Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: मॉलच्या स्कॅनिंग मशीनमधून ज्येष्ठ नागरिक महिलेची बॅग चोरीला

By मनीषा म्हात्रे | Updated: October 3, 2023 11:53 IST

सीसीटिव्ही समोर

मुंबई : घाटकोपरच्या आर सिटी मॉलच्या स्कॅनिंग मशिनमध्ये पीडितेची बॅग स्कॅन केली जात असताना, आरोपीने विरुद्ध बाजूने उभे राहून बॅग घेऊन पळ काढला. हा संपूर्ण प्रकार मॉलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मंगळवारी याचे सीसीटिव्ही व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला आहे. 

सुरक्षा रक्षकासमोरील स्कॅनिंग मशिनमधील बॅग चोरट्याने उचलली आणि ती घेऊन पळ काढला. आर सिटी मॉल मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्क साइट पोलिस ठाण्यात १ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई