पोलिसांमुळे "ती" नाळ सुखरूप; फूटपाथवरच बाळाला जन्म, 'निर्भया'मुळे दोघेही सुखरूप

By मनीषा म्हात्रे | Updated: November 9, 2023 23:05 IST2023-11-09T23:05:11+5:302023-11-09T23:05:29+5:30

फायर ब्रिगेडजवळील फुटपाथवर एका महिलेची प्रसूती झाल्याचा कॉल नियंत्रण कक्षात आला.

A mother fainted while giving birth to kid on the pavement in Mumbai. | पोलिसांमुळे "ती" नाळ सुखरूप; फूटपाथवरच बाळाला जन्म, 'निर्भया'मुळे दोघेही सुखरूप

पोलिसांमुळे "ती" नाळ सुखरूप; फूटपाथवरच बाळाला जन्म, 'निर्भया'मुळे दोघेही सुखरूप

मुंबई : फुटपाथवरच बाळाला जन्म देत आई बेशुद्ध झाली. मात्र, निर्भया पथकाने वेळीच त्यांच्याकडे धाव घेत, दोघांना  रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचल्याची घटना कुर्ल्यात समोर आली. 

विनोबा भावे नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास कमानी जंक्शन, फायर ब्रिगेडजवळील फुटपाथवर एका महिलेची प्रसूती झाल्याचा कॉल नियंत्रण कक्षात आला. तेथून माहिती मिळताच, निर्भया पथक तात्काळ रवाना झाले. स.फौ. बेटकर आणि महिला पो. शि. कुंभार यांनी बाळ आणि आई यांना नाळ जोडलेले अवस्थेत बैल बाजार येथील महापालिकेचे डॉ. आनंदीबाई जोशी दवाखाना येथे दाखल केले. तेथे प्रसूती झालेली महिला व बाळ यांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे दोघांचेही प्राण वाचले आहे. सुवर्णा सुभाष मीरगळ (३०) असे महिलेचे नाव असून ती शुद्धीवर आल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

Web Title: A mother fainted while giving birth to kid on the pavement in Mumbai.