Join us

तांत्रिक सुधारणेसाठी शासनाच्या वेबसाईटवरुन काढण्यात आला शासन निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 19:05 IST

सांस्कृतिक कार्य विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव या पुरस्काराच्या अनुषंगाने निवड समितीची बैठक होऊन मान्यवरांची निवड करण्यात आली होती. त्यासंदर्भातील शासन निर्णय तांत्रिक सुधारणा करण्यासाठी वेबसाईटवरुन हटविण्यात आला आहे. तो शासन निर्णय मागे घेण्यात आला नसल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य विभागाने दिले आहे.

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव या पुरस्काराच्या अनुषंगाने निवड समितीची बैठक होऊन मान्यवरांची निवड झाल्यानंतर यासंबंधीचा शासन निर्णय दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला होता. मात्र त्यामध्ये काही तांत्रिकदृष्ट्या सुधारणा करणे आवश्यक असल्यामुळे तो शासन निर्णय वेबसाईटवरून काढण्यात आलेला होता. या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून, लवकरच तो शासन निर्णय पुन्हा वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबईसांस्कृतिक