Join us
Daily Top 2Weekly Top 5

दारू प्यायला येण्यास नकार दिल्याने मित्रावर चॉपरने वार, मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By राजेश भोस्तेकर | Updated: June 12, 2023 20:02 IST

याबाबत आरोपी विरोधात मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

राजेश भोस्तेकरअलिबाग : दारू पिण्यासाठी आपल्या मित्राने बोलवल्यास नकार देऊ नका नाहीतर मित्राला राग येऊन मारहाण करू शकतो. असाच एक गुन्हा अलिबाग तालुक्यातील मांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. मित्राने दारू पिण्यास यायला नकार दिल्याने समजवायला गेलेल्या मित्रावर चॉपर सारखे दिसणारे धारदार हत्याराने वार करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडे गेल्यास ठार मारीन अशी धमकीही मारणाऱ्या मित्राने दिली आहे. याबाबत आरोपी विरोधात मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

फिर्यादी हे झिराड येथील राहणारे असून अलिबाग येथे काम करतात. अलिबाग येथून १० जून रोजी आपले काम आटोपून फिर्यादी आपल्या मित्राच्या गाडीवरून झिराडकडे घरी निघाले होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दिघोडे गावाच्या हद्दीत आले असता समोरून तीन आरोपी हे स्कूटी वरून आले. यावेळी आरोपी एक याने फिर्यादी याना हाक मारून थांबवले आणि आपण दारू प्यायला जाऊ असे म्हणाले. मात्र फिर्यादी याने त्याच्या ऑफरला धुडकावले. याचा राग आरोपीस आला. त्यावेळी फिर्यादी यांच्या सोबत असलेल्या मित्राने समजावण्याचा प्रयत्न केला. 

त्याचवेळी आरोपी असलेल्या दुसऱ्या मित्रा जवळ असलेल्या चॉपर सारखे दिसणारे धारदार हत्यार घेऊन आरोपीने फिर्यादी याचा मित्र अशोक यांच्या डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. तसेच फिर्यादी आणि त्याचा मित्र याला मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच पोलीस ठाणेत गेलास तर मारून टाकिन अशी धमकी दिली. याबाबत मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क.३२४,३२३,५०४, ५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सफौ किशोर पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :अलिबागगुन्हेगारी