Join us  

Video : वांद्रे येथे चार मजली घर कोसळले, ५ ते ६ जण अडकल्याची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2022 6:30 PM

A four-storey house collapsed in Bandra :घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि १ रेस्क्यू व्हॅन, ऍम्ब्युलन्स दाखल झाली आहे. 

मुंबई - वांद्रे परिसरातील ए के मार्ग, बेहराम नगर, रजा मस्जिद जवळ एक चार मजली बांधकाम असलेले घर कोसळले आहे. दुपारी ४ च्या दरम्यान हे बांधकाम कोसळले असून, ढिगाऱ्याखाली ५ ते ६ जण अडकले असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी मुंबईअग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि १ रेस्क्यू व्हॅन, ऍम्ब्युलन्स दाखल झाली आहे.  ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शोधकार्य सुरु आहे.

टॅग्स :अग्निशमन दलमुंबईइमारत दुर्घटना